(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे - temp

Sort By:

  • ऊर्जा खनिज : दगडी कोळसा

    दगडी कोळसा हे महत्त्वाचे ऊर्जा खनिज असून, याचा उपयोग औष्णिक ऊर्जा निर्मिती, रेल्वे, खते व रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून करतात.

    देशातील ७० टक्के विद्युत निर्मिती दगडी कोळशातून होत आहे.

    देशात सुमारे २५,३३० कोटी टन विविध प्रकारचा दगडी कोळसा असून, यापैकी ३.५ टक्के कोळसा साठे महाराष्ट्रात प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात एकवटलेले आहे.

  • दोन युध्दे अनुभवणारे हिंगोली

    लष्करी ठाणे असल्याने हिंगोली हे हैदराबाद राज्यातील महत्वपुर्ण घटक होते. इ. स. १८०३ साली टिपू सुलतान - मराठे तर इ. स. १८५७ मध्ये नागपूर - भोसले यांच्यातील युध्दे या शहराने अनुभवले आहे.

    स्वातंत्र्योत्तर काळात हिंगोली हे मुंबईच्या अधिपत्याखाली होते. हैदराबाद मुक्तीसंग्रामात हे शहर आघाडीवर होते. १ मे १९९९ पर्यंत हिंगोली हे परभणी जिल्ह्याचा भाग होते. त्यानंतर हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा आस्तित्त्वात आला.

    औंढा नागनाथ- हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे.

  • नागपूरची सीताबर्डी

    सीताबर्डी हा नागपूर शहराचा मध्यभाग. नागपूरमधील हा एक प्रमुख व्यापारी आणि निवासी भाग.

    सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो. येथील सीताबर्डी किल्ला एका टेकडीवर आहे. या टेकडीचे रुपांतर इंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. या किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढविल्याचीही नोंद आहे.

    नागपूरचे राज्यकर्ते अप्पा साहेब उर्फ मुधोजी व्दितीय यांनी हा किल्ला बांधला आहे. या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात आहे. इ.स. १८१७ च्या युध्दाचे हे प्रतीक मानले जाते. हा किल्ला नंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आला.

    वर्षात फक्त तिनदा, २६ जानेवारी व १५ ऑगस्ट व १ मे रोजी याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो.

  • खजाना विहीर

    महाराष्ट्रातील बीड हे अतिशय पुरातन शहर आहे. बिंदूसरा नदीच्या काठी वसलेल्या या शहरानजीक खजाना ही प्रसिध्द विहीर आहे. निजामशहाच्या सलाबत खान या सरदाराने या विहीरीचे बांधकाम केले आहे.

  • जम्मू शहरातील मुबारक मंडी पॅलेस

    जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू या शहरात मुबारक मंडी पॅलेस आहे.

    डोगरा राजांचे शाही निवासस्थान असलेल्या या पॅलेसला १५० वर्षांचा इतिहास आहे. राजस्थानी, मुगल, युरोपियन अशा तीन शैलीत हे महल बांधण्यात आले आहे.

  • जैन धर्मीयांची काशी – कर्नाटकातील कोप्पळ

    कोप्पळ हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. पर्वतरांगाच्या मध्यभागी वसलेल्या या सुंदर शहराला मोठा इतिहास आहे. इतिहासात या शहराचे नाव कोपनानगर असे आहे. या परिसरात ७२ झैनबस्त्या असल्याने या शहराला जैन समाजाची काशी म्हणूनही देशभर ओळखले जाते.

    पर्यटकांचे आवडते शहर

    कोप्पळ हे कर्नाटकातील एक पर्यटकप्रिय शहर आहे. येथील किल्ला गवीमठ आणि मालेमलप्पा मंदिर प्रेक्षणीय आहे. येथून जवळच असलेल्या इटगी येथील चालुक्यकालीन पुरातन महादेव मंदिरही सुंदर आहे.

    क्रांतिकारक बाळकृष्ण हरी चाफेकर हे या परिसरात काही काळ भूमिगत होते.

  • दिल्लीतील भारतीय रेल संग्रहालय

    दिल्ली येथील चाणक्यपुरीत भारतीय रेल संग्रहालयात रेल्वेचा तब्बल १४० वर्षांचा इतिहास आहे.

    विविध इंजिन आणि रेल्वेच्या डब्यासह देशातील पहिल्या रेल्वेचे मॉडेल आहे.

    ब्रिटीश वास्तुकार एम. जी. सेटो यांनी इ.स. १९५७ मध्ये या संग्रहालयाचे बांधकाम केले. १० एकरात हे संग्रहालय आहे.

  • खान्देशातील पाचोरा शहर

    पाचोरा हे जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पाचोरा हे खान्देशातील एक महत्त्वाचे शहर आहे.

    पाचोरा हे मध्य रेल्वेच्या मार्गावरचे भुसावळ नजीकचे मोठे जंक्शन असून राज्य महामार्ग क्रमांक १९ वर ते येते. हे शहर राज्य मार्ग तसेच लोहमार्गानी देशाशी जोडलेले आहे.

    इथले १५० वर्षे जुने बालाजी मंदिर प्रसिध्द असून बालाजीची रथयात्रा प्रत्येक वर्षी काढली जाते. यासाठी वापरण्यात येणारा रथ १५० फूट उंचीचा व भव्य आहे. हजारो भाविक तो ओढतात.

    इथेच ८०० वर्षांपूर्वीचे जुने खंडोबाचे देवालयही असून इथेही प्रतिवर्षी मोठी यात्रा भरते.

  • कोकणचा मेवा – करवंदे

    डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदे पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो.

  • डोंबिवलीत संपन्न झालेली साहित्य संमेलने

    डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७ मध्ये संपन्न झाले. या साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापूर्वी विविध विभागीय साहित्य साहित्यसंमेलने संपन्न झाली आहेत.