तंजावूर हे तामिळनाडू राज्यातील जिल्ह्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. देश-विदेशातील पर्यटक या मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. येथील ब्रहाडीवरार मंदिर खूपच प्रेक्षणीय असून त्याला स्थानिक लोक मोठे मंदिर असेही म्हणतात. येथून जवळच असलेला शाही राजवाडाही प्रसिध्द आहे.
दक्षिणेतील मराठी ठाणे
तंजावूर दहाव्या शतकाच्या मध्यापर्यत चोल राजांच्या अधिपत्याखाली होते. पुढे ते शहाजीराजांच्या अधिपत्याखाली आले. १६७६ मध्ये शहाजीराजांचे चिरंजीव व्यंकोजीराजे हे इथले सस्थानिक बनले.
कर्नाटक राज्यातील दावणगेरे शहरात बनविला जाणारा लोणी डोसा देशभर प्रसिध्द आहे.
दावणगेरे हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर असून भौगोलिकदृष्ट्या हे शहर राज्याच्या केद्रस्थानी येते.
राष्ट्रीय महामार्ग क्र ४ वर वसलेले या शहराचे बंगलोरपासूनच अंतर २६५ किलोमीटर आहे.
१९९७ साली चित्रदुर्ग जिल्ह्याचे विभाजन करुन वेगळा दावणगेरे जिल्हा बनविण्यात आला इथले दावणगेरे विद्यापीठ दावणगेरे शहराच्या नावाचा उच्चार बर्याचदा दावणगिरी असा चुकीचा केला जातो.
हे शहर कर्नाटकाचे मँचेस्टर म्हणूनही ओळखले जाते. इथे घरोघर यंत्रमाग व हातमाग पाहायला मिळतात.
दुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे जगातील सर्वाधिक उंच इमारत म्हणून ओळखले जाते. या टॉवरची उंची ८१८ मीटर एवढीआहे. यापूर्वी तैपई १०१ ही ५०८ मीटर उंचीची इमइरत सर्वाधिक उंच समजली जात होती. त्यापूर्वी अमेरिकेच्या ४४३ मीटर उंचीच्या सीअर टॉवर्स शिकागोने हे स्थान मिळवलेले होते. नंतर हे स्थान मलेशियातील क्वालालांपूर येथील पेट्रोनॉस ट्वीन टॉवर्सने घेतले होते.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे.
हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे.
मौर्य राजानंतर सत्तेवर आलेल्या सातवाहन शासकांनी हा घाट खोदल्याची नोंद इतिहासात आहे. या घाटामुळे कोकणातील दळणवळण सुलभ झाली.
उड्डपी हे दक्षिण -पश्चिम कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे, इथले कृष्ण मंदिर प्रसिध्द असून वैष्णव संत माधवाचार्य यांनी ते स्थापन केले आहे वादळात अडकलेल्या एका व्यापारी जहाजाला सुखरुप किनार्यावर येण्यासाठी माधवाचार्याँ मदत केली होती यामुळे खुश झालेल्या व्यापार्यांनी हे मंदिर बांधण्यास मोठी मदत केली.
उड्डपी शहरात तुलू ही स्थानिक भाषा येथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते. त्याचबरोबर कोकणी व कन्नड या भाषाही येथे बोलल्या जातात या शहरातील लोकांचे दरडोई उत्पन्न संपूर्ण कर्नाटकात सर्वाधिक आहे.
सिंडिकेट बँक व कॉपोरिशन बँक या बँकांची स्थापना याच शहरात झाली आहे.
कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे.
ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून जास्त वर्षांचे आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, अश्मयुगीन हत्यारे, कोरीव वस्तू यासारख्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो.
हे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आहे. विशेष म्हणजे हे संग्रहालय राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या संग्रहालयांमधील सर्वात मोठे व जुने असे आहे.
या संग्रहालयात भूगर्भशास्त्र, सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी, पुरातत्व, शस्त्र, नाणे विषयक, नृत्त्य, चित्रकला अशी विविध प्रकारच्या पुरातन संस्कृतीची ओळख करुन देणारी दालने आहेत.
या संग्रहालयाविषयी अधिक माहिती वाचा खालील लिंकवर..
http://www.marathisrushti.com/articles/150-years-old-central-museum-at-nagpur/
डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदे पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो.
इटलीमधील सिंक टेरेरे हे पाच खेड्यांनी मिळून बनलेले शहर आहे. समुद्राच्या काठावर बांधण्यात आलेल्या वैशिष्टपूर्ण इमारतीमुळे याची युनेस्कोच्या वारसा यादीत नोंद आहे.
चामराजनगर हे शहर कर्नाटक राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले एक मोठे शहर आहे. म्हैसूरचे नववे राजे चामराज यांच्या नावावरुन या शहराचे नाव पडलेले असून, कर्नाटकातील तुलनेने हे एक अल्पविकसित असे शहर आहे.
तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांच्या सीमा चामराजनगरपासून खूपच जवळ आहेत. म्हैसूरपासून राष्ट्रीय महामार्घ क्र. १७ वरुन चामराजनगरला जाता येते.
चामराजनगर आणि परिसरात अनेक प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. चामराजराजेश्वर मंदिर, बन्नारी अमन मंदिर, गोपालस्वामी मंदिर, बांदिपुरा राष्ट्रीय अभयारण्य, शिवनासमुद्र धबधबा आदींचा त्यात समावेश आहे.
प्रसिध्द भवानीसागर धरण येथून ७५ कि.मी. वर आहे.
अंकोला हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्हयातील एक छोटे शहर आहे हे निसर्गसंपन्न शहर अरबी समुद्राच्या किनार्यावर वसलेले असून इथले स्वच्छ सुंदर व लांबच लांब असलेले अनेक समुद्रकिनारे देशविदेशांतील पर्यटकांना आकर्षीत करतात. बस्कल गुड्डा बीच नादिबाग बीच केनी बीच इत्यादी विशेष प्रसिध्द आहेत इथले लक्ष्मीनारायण मंदिरही प्रेक्षणीय आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti