मुंबईच्या समुद्र किनार्यापासून अरबी समुद्रामध्ये लेण्या आहेत. या लेण्याना एलिफंटा केव्हज् असे म्हणतात. गेट वे ऑफ इंडियापासून या लेण्यासाठी मोटारबोटीसोबतच लेण्या पाहण्याचा आनंद मिळतो.
अरुणाचलच्या दिंबाग घाटी या जिल्ह्यातील अनीनी शहर हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
निसर्ग संपन्नतेमुळे स्वर्गीय सौंदर्य म्हणूनच याची ओळख आहे.
शांतीप्रिय पर्यटन स्थळ म्हणूनही या शहराची ओळख आहे.
दक्षिण पश्चिम कर्नाटकातील मंगलोर हे एक प्रमुख शहर आहे. हे शहर नेञावती व गुरपूर या नद्यांच्या मधोमध वसलेले असून ,अरबी समुद्रावरचे एक मोठे बंदर आहे. गुरपूर नदीच्या पाञाव्दारे अनेक मोठी जहाजे बंदरात आणली जातात.या निसर्गसंपन्न शहराच्या परिसरात सुंदर बीच असून देशभरातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात.

शीखधर्माचे आठवे गुरु हरिकिसन साहिब यांना समर्पित प्रमुख धार्मिक केंद्र आहे. हे शीख धर्मीयांचे श्रध्दास्थान आहे.
गुरु बंगला साहिब सुरुवातीला एक हवेली होती. यामध्ये इ.स. १६६४ मध्ये हरिकिसन साहिब दिल्ली यात्रेदरम्यान थांबले होते. या काळात येथे महामारी पसरल्यानंतर गुरु हरिकिसन यांनी येथेच गोरगरिबांची सेवा केली.
महात्मा गांधींनी १९२२ साली चरखा हे स्वावलंबन व मानवतेचे प्रतीक म्हणून स्वातंत्रलढ्यात समोर आणला.
१४११ साली गुजरात येथील अहमदाबाद येथे आढळून आल्याचे इतिहासाचे जाणकार नमूद करतात.
चरखा हे नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तुंपासून सूत कातण्याचे एक साधन आहे. भारतात गांधीजींनी याचा प्रसार केला.याद्वारे ते सूतकताई करून त्याची वस्त्रे बनवित असत. स्वदेशी वस्तु वापरण्याकडे त्यांचा कल होता. लाकडी चरखा, दोन चक्रांचा चरखा, पायानी चालवायचा चरखा, यांत्रिक चरखा इत्यादी चरख्यांचे विविध प्रकार आहेत.
राज्यातील पानझडी व सदाहरित वनांच्या दरम्यान उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने आढळतात. १५० ते २०० से.मी. पर्जन्यक्षेत्रात ही वने सलग न आढळता तुटक स्वरुपात आढळतात.
पालीन हे अरुणाचल प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आणि एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. कुरुंगकुमे या जिल्ह्यात हे शहर येते. समुद्रसपाटीपासून १०८० मीटर उंचीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या ५८१६ इतकी आहे.
ठाणे स्थानकाच्या पश्चिम बाजूच्या स्टेशन रोड वर (सुभाष पथ) पायी १० ते १५ मिनिटाच्या अंतरावर जांभळी नाक्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकात मांदार सिद्धिवियकाचे मंदिर आहे. हे मंदिर खाजगी मालकीचे असून दररोज भक्तांसाठी उघडे असते.
सुमारे ३०० वर्षापूर्वी श्री पंडित यांच्या पुर्वजांना दृष्टांत झाला की 'मी मांदार झाडाखाली असून मला वर काढा. ' त्याप्रमाणे मांदार वृक्षाखालील जागा उकरली असता ही गणेश मूर्ती सापडली.ती मूर्ती उजव्या सोंडेची स्वयंभू आहे.
येथील गणपतीला वाड्या भरतात. त्या बघण्यासारख्या असतात.
अमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते.
प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.
पुणे हे पेशवाईपासून बागांसाठी प्रसिद्ध शहर आहे. पेशवाईत पुणे शहराच्या आसपास किमान डझनभर बागा होत्या. त्यातील काही आजही आहेत तर काहींची फक्त नावेच शिल्लक आहेत.
पुणं म्हटलं की पहिली आठवते ती सारस बाग. मात्र याशिवाय हिराबाग, मोतीबाग, माणिक बाग, रमणबाग, कात्रजची बाग, रानवडी बाग इत्यादिही प्रसिद्ध आहेत.
याशिवाय पुण्यात जिजामाता बाग, बंड गार्डन, संभाजी उद्यान, कमला नेहरू उद्यान ही ठिकाणेही सकाळ सध्याकाळ गजबजलेली असतात.
Copyright © 2025 | Marathisrushti