(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे - temp

Sort By:

  • चवदार तळे

    रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे. २० मार्च १९२७ रोजी बाबासाहेबांनी तवदार तळे अस्पश्यांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह केला आहे.

  • डोंबिवलीचा ऐतिहासिक वारसा

    तुर्भे बंदराजवळील माहुल गावी शिलाहार राजा हरिपालदेव ह्याचा शके १०७५ (सन ११५३) मधील एक लेख सापडला असून त्यात “डोंबिल वाटिका ” असा उल्लेख आहे.

  • पालीन

    पालीन हे अरुणाचल प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आणि एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. कुरुंगकुमे या जिल्ह्यात हे शहर येते. समुद्रसपाटीपासून १०८० मीटर उंचीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या ५८१६ इतकी आहे.

  • अमेझॉन – जगातली सर्वात मोठी नदी

    अमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी मानली जाते. अर्थात लांबीनुसार नाही.. तर तिच्यातून वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहानुसार. प्रति सेकंदाला तिच्यातून तब्बल १,२०,००० क्युबिक मीटर्स पाणी वाहत असते.

  • ऐतिहासिक गोल घर – पाटणा

    बिहारची राजधानी पाटणा शहरातील गोल घर हे जगप्रसिध्द आहे. गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग यांनी सन १७७० मध्ये गोल घर निर्मितीची योजना तयार केली.

  • कोकणचा मेवा – आंबा

    उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या दिसू लागतात. हापूसला चांगली किंमत येत असल्याने बागेची राखण करण्यासाठी गड्यांची हालचाल सुरू झालेली दिसते. आंब्याच्या पॅकींगसाठी लाकडी पेट्या बनविण्याचा व्यवसाय सुरू होतो.

    भातशेतीनंतर उरलेला पेंढा शेतकरी उडवी (ढीग) करून जपून ठेवतात. या पेंढ्याला आंबा पॅकींगसाठी मागणी असते. स्थानिक बाजारापासून सातासमुद्रापारही हा हापूस जातो. मुंबई-गोवा महामार्गावरही अनेक ठिकाणी शेतकरी आंबा विक्रीसाठी बसलेले असतात. रत्नागिरीकडून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या प्रत्येक खाजगी वाहनात किंवा एसटीमध्ये हापूसची पेटी या दिवसात दिसतेच.

  • आदिलशाही पॅलेस

    गोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले.

  • ऐतिहासिक आणि धार्मिक अहमदनगर जिल्हा

    अहमदनगर आणि जिल्हा यांना इतिहासात स्थान आहे. सहकारक्षेत्र आणि साखर उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. अहमदनगर जिल्ह्यात चांदबिबीचा महाल, ऐतिहासिक भुईकोट किल्ला, संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन व विकास विभाग, भिंगार छावणी तसेच कारागृह आहे.

  • पुणे जिल्ह्यातील प्राचीन नाणेघाट

    महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे.

    हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे.

    मौर्य राजानंतर सत्तेवर आलेल्या सातवाहन शासकांनी हा घाट खोदल्याची नोंद इतिहासात आहे. या घाटामुळे कोकणातील दळणवळण सुलभ झाली.

  • करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

    करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७६८५ किलोमीटर एवढे आहे. येथील महालक्ष्मी मंदिर, गुळाची बाजारपेठ प्रख्यात आहे. चित्रनगरीने शहराचा नावलौकिक वाढवला असून, कोल्हापुरी चप्पल जगप्रसिध्द आहे.::