औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.
व्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.
अंकोला हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्हयातील एक छोटे शहर आहे हे निसर्गसंपन्न शहर अरबी समुद्राच्या किनार्यावर वसलेले असून इथले स्वच्छ सुंदर व लांबच लांब असलेले अनेक समुद्रकिनारे देशविदेशांतील पर्यटकांना आकर्षीत करतात.
अहमदनगर या शहराला ५०० वर्षाचा इतिहास आहे. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला होता. १८१७ साली ब्रिटिशांनी जिंकले होते. या शहराला नगर नावानेही ओळखले जाते. सीना नदीच्या काठावर हे शहर वसले आहे. किल्ला, रेणुका माता मंदिर, चांदबिबी महल शहराचे वैशिष्ट्य आहे.
अहमदनगर शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी ही अष्टकोनी वास्तू आहे. या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी ती दुसऱ्या सलाबतखानाची कबर आहे. दुसरा सलाबतखान हा चौथा निजाम मूर्तजा याचा वजीर होता. मूर्तजाने त्याच्या चंगीजखान या वजिराला संशयावरून मृत्युदंड दिला आणि त्याच्या जागी १५७९ मध्ये सलाबतखानाची नेमणूक केली होती.
या दुसऱ्या सलाबतखानाने अहमदनगर शहरात खापरी नळातून पाणी आणले.
या कबरीला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
साबरमती नदीच्या पश्चिम किनार्यावर गांधीनगर हे शहर वसले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ गांधीनगरचे नामकरण करण्यात आले.
चंदीगढनंतर गांधीनगर हे दुसरे नियोजित शहर असून, १९६६ मध्ये गुजरातची राजधानी अहमदाबादहून गांधीनगर करण्यात आली.
स्वामीनारायण संप्रदायाचे प्रसिध्द स्वामीनारायण मंदिर येथील आकर्षण आहे.
कसबा गणपती हा पुणे शहराचे ग्राम दैवत म्हणून ओळखला जातो. पुणे शहरात कसबा पेठेत जिजामाता उद्यानाजवळ हे गणेश मंदिर आहे.
इ.स. १६३६ साली शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला तेव्हा जिजाबाईनी ह्या गणेशाची समारंभपूर्वक स्थापना केली. श्रीचे मंदिर चारही बाजूने बंदिस्त असून पश्चिमाभिमूख आहे पण गणेश मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूर्ती ३ फुट उंच ५ फुट रूंद आकाराची आहे. या मूर्तीला दोन हिऱ्याचे डोळे व माणकाची बेंबी आहे.
पुणेकर मंगल कार्याची अक्षदा प्रथम या गणेशाला देतात.
कराड हे सातारा जिल्ह्यातील शहर असून यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणूनही ते ओळखले जाते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा कराडचेच. महाराष्टाचे कार्ल मार्क्सं म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव मोहिते हेही कराड तालुक्यातीलच.
कराडमध्ये कृष्णा व कोयना या महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या नद्यांचा संगम आहे. याला प्रीतिसंगम असे म्हणतात.
बागलकोट हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर असून या शहरात हजारो वर्षाचा इतिहास आहे. एका शिलालेखावरील उल्लेखानुसार या शहराचे नाव बागडिगे असे होते. रावणाने हे शहर आपल्या वाजंत्र्यांना भेट दिले होते. हेच शहर विजापूरच्या राजाने आपल्या मुलाला लग्नात भेट दिल्याचीही दंतकथा आहे. हे शहर विजयनगर साम्राज्याचाही काही काळ भाग होते.
बीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. या शहरातून बिंदुसरा नदी वाहते.
बडनेरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. येथे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे.
या शहराचे मुख्य दोन भाग असून एका भागाचे नाव जुनी बस्ती, तर दुसर्या भागाचे नाव नवी बस्ती असे आहे. जुन्या वस्तीतील हजरत अलमास शाह उर्फ कमलीवाले बाबा यांचा दर्गा प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात येथे उरुस साजरा केला जातो. हा उरुस म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti