(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे - temp

Sort By:

  • खांब तलाव – भंडारा

    भंडार्‍यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे.

    या प्राचीन खांब तलावाला ९०० वर्षाचा इतिहास आहे. महानुभव पंथाच्या लिळा चरित्रात या तलावाचा देवकी तलाव असा उल्लेख आहे. महानुभव पंथाचे सस्थापक चक्रधर प्रभु यांनी खांब तलावाच्या काठी जेवण आणि मुक्काम केल्याच्या नोंदी लिळा चरित्रात आहेत.

  • ऐतिहासिक नांदेड जिल्हा.

    मराठवाड्यातील औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किलोमीटर आहे.

  • ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट

    ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट हे ज्वालामुखीनिर्मित बेट असून, या ठिकाणी हजारो प्राण्यांच्या जाती आढळतात. पक्षी अभ्यासकांसाठी हे बेट महत्त्वपूर्ण आहे.

  • निसर्ग सौंदर्याचे शहर : अनीनी

    अरुणाचलच्या दिंबाग घाटी या जिल्ह्यातील अनीनी शहर हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. निसर्ग संपन्नतेमुळे स्वर्गीय सौंदर्य म्हणूनच याची ओळख आहे.

  • प्राचीन शहर अचलपूर

    अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे.

  • जामनेरची केळी आणि संत्री

    जामनेर हे जलगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर कापूस, केळी आणि संत्री यांकरिता प्रसिध्द असून, जळगावपासून अवघ्या ३७ किलोमीटरवर आहे.

    औरंगाबाद बुरहानपूर महामार्गावरील या शहरापासून जगप्रसिध्द अजंठा लेणी २९ किलोमीटरवर आहेत. तसेच वेरुळ लेणी १३० किलोमीटरवर आहेत.

    येथील रामवनही प्रसिध्द आहे.

  • दौडनगर किल्ला

    दौडनगर बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पुरातन किल्ला आहे. इ. स. १७ व्या शतकात दाऊद खान याने या किल्ल्याचे बांधकाम केले आहे.

  • ओपेरा हाऊस

    सिडनीतील ओपेरा हाऊसची रचना डच आर्कोटेक्ट जॉन उत्झॉन यांनी केली. २० ऑक्टोबर १९७३ रोजी त्याचे उद्घाटन झाले.

  • गदग-बेटागेरी – कर्नाटकातील मंदिरांचे शहर

    कर्नाटक राज्यातील गदग आणि बेटागेरी या दोन शहरांची मिळून एकच महापालिका बनविण्यात आली आहे. याच शहरात गदग जिल्ह्याचे मुख्यालयही आहे.

    गुती-वास्को महामार्गावर असणारे हे दुहेरी शहर हुबळीपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेचे गदग हे महत्वाचे जंक्शन असून हुबळी-होस्पेटगुंटुकल लाईनवर ते आहे.

    मंदिरांचे शहर

    गदग-बेटागेरी या शहरांत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील त्रिकुटेश्वर महामंदिरात शिव,ब्रम्हा आणि सूर्य यांची स्वतंत्र मंदिरे असून, चालुक्यकालीन शिल्पकलेचे सैादर्य येथे पाहायला मिळते. येथील प्राणिसंग्रहालयही खूपच प्रसिध्द असून ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात.

  • अलिबाग – महाराष्ट्राचं मिनी गोवा

    निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले अलिबाग शहर महाराष्ट्राचं मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. १७ व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हे शहर वसवले आहे.