
हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे अतिशय प्राचीन ब्रह्मसरोवर आहे.
इ.स. पूर्व अकराव्या शतकात अल बेरूनी यांनी किताब-उल-हिंद असे सरोवराचे नामकरण केले.
हिंदू धर्मात या पवित्र स्थळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण शहर आहे.
लोह-इस्पात उद्योगासोबतच पितळ आणि तांबा उद्योगातही या शहराची भरारी आहे.
एक नियोजित शहर असून, पर्यावरणासाठी दहावेळ पंतप्रधान चषक या शहराने जिंकले आहे.
प्राचीन काळात कौशल राज्याचा हिस्सा हे शहर होते.
धुळे शहरात इ.स.१९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली. मुगल आणि राजपूत काळातील ऐतिहासिक लेख, चित्र, नाणी,व २००० पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह येथे आहे.
चामराजनगर हे शहर कर्नाटक राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले एक मोठे शहर आहे. म्हैसूरचे नववे राजे चामराज यांच्या नावावरुन या शहराचे नाव पडलेले असून, कर्नाटकातील तुलनेने हे एक अल्पविकसित असे शहर आहे.
तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांच्या सीमा चामराजनगरपासून खूपच जवळ आहेत. म्हैसूरपासून राष्ट्रीय महामार्घ क्र. १७ वरुन चामराजनगरला जाता येते.
चामराजनगर आणि परिसरात अनेक प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. चामराजराजेश्वर मंदिर, बन्नारी अमन मंदिर, गोपालस्वामी मंदिर, बांदिपुरा राष्ट्रीय अभयारण्य, शिवनासमुद्र धबधबा आदींचा त्यात समावेश आहे.
प्रसिध्द भवानीसागर धरण येथून ७५ कि.मी. वर आहे.
विल्यम द कॉन्करर याने १०६६ मध्ये टॉवर ऑफ लंडनची उभारणी केली. सामरिक आणि वास्तुकला या दोन्हीच्या दृष्टीने या टॉवरचे महत्त्व मोठे आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार हे तालुक्याचे ठिकाण असून, याचे प्राचीन नाव खंदार असे होते. कंधार शहर राष्ट्रकुटांची राजधानी होते. कंधार गावाला लागूनच सोमेश्वर तिसरा या राष्ट्रकुट राज्याच्या काळात भांधला गेलेला भुईकोट किल्ला आहे.
औरंगाबादपासून ५० कि.मी अंतरावर गोदावरी नदीच्या किनार्यावर वसलेल्या पैठण या शहराला हजारो वर्षाचा इतिहास आहे. पैठण पूर्वी सातवाहन राजांची राजधानी होती.
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील हे एक ऐतिहासिक पुरातन शहर आहे. मन आणि म्हैस या नद्यांच्या संगमावर वसलेल्या या शहरात बाळादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. हातमागावर तयार होणार्या येथील सतरंज्या लोकप्रिय आहेत.
कोझीकोडे हा पूर्वी मलबारमधील महत्त्वाचा प्रदेश होता. येथून वास्को-द-गामा पूर्वेकडील मसाल्यांच्या शोधात उतरला होता. शांत किनारे, हिरवीगार खेडी, ऐतिहासिक ठिकाणे यांमुळे हा परिसर पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. येथील समुद्रकिनार्याजवळील लाईट हाउस शेजारी १०० वर्षीपूर्वीचे समुद्रात वाकलेले दोन खांब आहेत.
समृध्द लोहखनिजासाठी भारत जगातील एक अग्रेसर राष्ट्र म्हणून ओळखले जाते. केरळातील कोझीकोडे हे पर्यटन क्षेत्राबरोबरच लोहसाठ्यासाठीही प्रसिध्द आहे.
बागलकोट हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर असून या शहरात हजारो वर्षाचा इतिहास आहे. एका शिलालेखावरील उल्लेखानुसार या शहराचे नाव बागडिगे असे होते. रावणाने हे शहर आपल्या वाजंत्र्यांना भेट दिले होते. हेच शहर विजापूरच्या राजाने आपल्या मुलाला लग्नात भेट दिल्याचीही दंतकथा आहे. हे शहर विजयनगर साम्राज्याचाही काही काळ भाग होते.
Copyright © 2025 | Marathisrushti