(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे - temp

Sort By:

  • एंजेल धबधबा

    व्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्‍या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.

  • इंग्लंडमधील विंडसर किल्ला

    विंडसर किल्ला हा इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीच्या रहिवासामुळे प्रसिध्द आहे. बर्कशायर येथे असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५ व्या शतकात राजा हेन्री प्रथमच्या काळात झाले आहे. थेम्स नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या या शहराच्या ईशान्य टोंकास उंच टेंकडीवर विंडसर किल्ला आहे. जुनें विंडसर गांव थेम्स नदीच्या कांठावर ”होमपार्क” च्या दक्षिणेस आहे.

  • जैसलमेर येथील मरु उद्यान

    राजस्थानातील जैसलमेरमध्ये असलेले मरु उद्यान हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.

    या उद्यानात लक्षवधी वर्षांपूर्वीच्या वृक्षांचे फॉसिल्स आहेत. इ.स. १९८० मध्ये या उद्यानाची निर्मिती झाली आहे.

  • गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    मध्येप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरील गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने ४ पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इटियाडोह धरण व नवेगाव राष्टीय उद्यान या पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

  • खाणकामगारांचे सेवेल

    चिलीमधील सेवेल हे गाव बार्डन कॉपर कंपनीने खाणकामगारांसाठी वसविले आहे. जगातील सर्वात मोठ्या तांब्याच्या खाणीभोवती हे गाव आहे.

    सेवेल हे कामगांरासाठीच्या वसाहतीचे आदर्श उदाहरण मानले जाते.

  • उत्तर धुवाजवळील भारताचा अभ्यास तळ

    पर्यावरणातील बदलांसह विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारताने उत्तर ध्रुवाजवळ नॉर्वेजवळच्या नाय -अलसंद येथे हिमाद्री हा कायमस्वरुपी तळ उभारला आहे.

  • जिंतूरच्या सहा जैन लेण्या

    महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. येथे गुहेतील जैन लेणी प्रसिध्द आहेत. शहराला लागूनच असलेल्या डोंगरात सहा जैन लेण्या आहेत. यामध्ये आदिनाथ, शांतिनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ, नंदेश्वर शुकट व बाहुबली यांचा समावेश आहे. प्राचीन काळचे जैनपूर म्हणजेच आजचे जिंतूर होय.

  • दोन युध्दे अनुभवणारे हिंगोली

    लष्करी ठाणे असल्याने हिंगोली हे हैदराबाद राज्यातील महत्वपुर्ण घटक होते. इ. स. १८०३ साली टिपू सुलतान – मराठे तर इ. स. १८५७ मध्ये नागपूर – भोसले यांच्यातील युध्दे या शहराने अनुभवले आहे.

     

  • आधुनिक डोंबिवली

    डिसेंबर १९२१ मध्ये डोंबिवली येथे ग्रामपंचायत अस्तित्वात आली. कै मणीलाल ठाकूर हे या ग्रामपंचायतीचे पहीले अध्यक्ष तर कै बहिराव अभ्यंकर हे पहीले सरचिटणीस होते. ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर १९३१ साली वीजपुरवठा सुरु झाला. १९३६ साली पंचायत विहीर बांधण्यात आली. वीज व पाणी आल्यामुळे या शहराची वस्ती वाढू लागली.

  • बापू कुटीचे सेवाग्राम

    वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा शहरापासून केवळ ८ कि.मी अंतरावर आहे.