जुन्नर गावातील शंकरपूरा भागात हे गणेश मंदिर आहे. या मूर्तीला लेण्याद्रीचाच गणपती येथे आला आहे असे मानले जाते.
गुटी हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. प्राचीन काळी हे शहर सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा एक भाग होते.
नेदरलँडमधील लिस्से येथे असणारी केवूकनॉफ ही जगातील सर्वांत मोठी फुलांची बाग आहे. या बागेत सुमारे सत्तर लाख फुले आहेत. १९४९ मध्ये ही बाग फुलविण्यास प्रारंभ झाला.
औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (हाजीरा-धुळे-कोलकाता) या जिल्ह्यातून जातो. मध्य रेल्वेचे मुंबई-दिल्ली व मुंबई-कोलकाता हे लोहमार्ग जळगाव, भुसावळमार्गे जातात.
प्रत्येक मोठ्या शहरात एखादा प्रमुख व्यापारी भाग असतो. राजधानी दिल्ली शहरात असा प्रमुख व्यापारी भाग आहे कॅनॉट प्लेस येथे.
इटलीमधील सिंक टेरेरे हे पाच खेड्यांनी मिळून बनलेले शहर आहे. समुद्राच्या काठावर बांधण्यात आलेल्या वैशिष्टपूर्ण इमारतीमुळे याची युनेस्कोच्या वारसा यादीत नोंद आहे.
जालना हा कृषिप्रधान जिल्हा असून, दोन्ही हंगामात घेतले जाणारे ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. करडई उत्पादनाच्या दृष्टीने हा जिल्हा महत्त्वपूर्ण ठरतो.
देशाची राजधानी दिल्लीतील कुतूब मिनारनजीक जवळपास ३ एकराच्या विस्तीर्ण परिसरात अहिंसा स्थळ आहे.
या ठिकणी भगवान महावीरची कमळात बसलेली १७ फूट उंच मूर्ती आहे. ५० टनांहून जास्त वजनाच्या मूर्तीची १९८० साली स्थापना करण्यात आली आहे.
येथेच ब्रिटीश अधिकारी थॉमस मेटकॉफ यांनी १९ व्या शतकात तयार केलेला प्रकाश स्तंभ आहे.
कोझीकोडे हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये कोझीकोडेचा तिसरा क्रमांक लागतो. तिरुअनंतपूरमपासून ३८० किलोमीटरवर ते वसलेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti