लेखसंग्रह

  • वाट, वाटसरू आणि वाटाडे! – Premium

     
    प्रकाश पोहरे

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे जे अनेक भाग झाले आहेत त्यापैकी दोन भागांचे शक्तिप्रदर्शन विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात पार पडले. शक्तिप्रदर्शनापूर्वी उभय गटातील वाद एवढा विकोपास गेला होता की संघर्षाची ठिणगी पडते की काय, असे वाटायला लागले होते. सुदैवाने ती परिस्थिती टळली. मात्र या शक्तिप्रदर्शनाच्या निमित्ताने रिपब्लिकन नेत्यांच्या बुद्ध धर्माच्या निष्ठेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • मूर्ख आणि शहाणे! शिका! – Premium

     
    प्रकाश पोहरे

    समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्‍या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.

  • जरा आजूबाजूला बघायला शिका! – Premium

     
    प्रकाश पोहरे

    बायबलमध्ये एक बोधकथा आहे. येशू ख्रिस्त फिरत-फिरत एका गावात आले. त्यावेळी त्यांना दिसले की गावातील सगळेच लोकं एका मैदानात जमले आहेत. प्रत्येकाच्या हातात दगड आहे आणि मैदानाच्या मध्यभागी एका खांबाला बांधलेल्या स्त्रीला ते दगडांनी ठेचून मारणार आहेत. त्या स्त्रीचा अपराध कोणता, याची चौकशी केल्यावर येशू ख्रिस्तांना सांगण्यात आले की, ही स्त्री व्यभिचारी आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिला दगडांनी ठेचून मारण्यात येणार आहे.

  • तर्कशास्त्राची ऐशीतैशी – Premium

     
    प्रकाश पोहरे

    जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत मानवाला अधिक बुध्दिमत्तेचे वरदान लाभले आहे. या अत्त्याधिक (?) बुध्दीचा वापर करून मानवाने आपले भौतिक, भावनिक, मानसिक जीवन समृध्द करण्यासाठी अनेक शास्त्रांना जन्म दिला. चौसष्ट कलांची चौसष्ट शास्त्र निर्माण झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये. या शास्त्रांच्या गर्दीतलेच एक शास्त्र आहे, ‘तर्कशास्त्र’! एखाद्या ठिकाणी धूर दिसत असेल तर तिथे आग असतेच, हा तर्कशास्त्राचा पायाभूत सिध्दांत. थोडक्यात एखाद्या गोष्टीची अनुभूती, अनुभव न घेता अनुमानाने त्या गोष्टीचे अस्तित्त्व सिध्द करणे म्हणजे तर्कशास्त्र. मोठमोठ्या विद्वान, शास्त्रज्ञांना हे तर्कशास्त्र जसे उपयोगी पडले किंवा पडत आहे

  • खाण तशी माती – Premium

     
    प्रकाश पोहरे

    ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. बीज जर शुद्ध असेल तर त्यापासून तयार होणाऱ्या झाडाला लागणारी फळे रसरशीत, कसदार आणि अवीट चवीचीच असणार. मात्र मुळात बीजच अशुद्ध असेल तर फळेही निकस आणि निकृष्टच निपजणार. हा न्याय केवळ वनस्पतीसृष्टीलाच लागू आहे, असे नाही. खरे म्हटले तर हा न्याय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू पडतो. एखाद्या कुटुंबातील मुले नालायक निघालीत तर आपण सहजच म्हणून जातो, ‘पेराल ते उगवेल’.

  • सज्जनांची तटस्थता

     
    प्रकाश पोहरे

    आज संपूर्ण जग हे समस्यांचे माहेरघर झालेले आहे. एकजात सर्वांनी होकारार्थी माना डोलवाव्यात असेच हे वाक्य आहे आणि सर्वांच्या माना डोलतातसुध्दा. परंतु केवळ माना डोलावण्याने काय साध्य होणार? समस्या उद्भवणे आणि त्यांचे निराकरण हे जगाचे रहाटगाडगे चालू राहण्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे समस्यांच्या निराकरणाचा प्रयत्न व्हायला पाहिजे. असा प्रयत्न आज होताना दिसत नाही किंवा होतही असतील तर त्याचे प्रमाण आणि परिणाम अत्यल्प असतात. आज संपूर्ण जग समस्यांचे माहेरघर झाले आहे, असे म्हणावे लागते ते त्याचमुळे. समस्या उद्भवण्याचे प्रमाण आणि त्यांच्या निराकरणाचा प्रयत्न यातील दरी दिवसेंदिवस रूंद होत आहे. यामागे प्रमुख कारण जर कोणते असेल तर ते म्हणजे समस्यांच्या मुळापर्यंत न जाता येणे.

  • नोकरशाहीचे उफराटे सल्ले

     
    प्रकाश पोहरे

    प्रगतीचा एकेक टप्पा गाठणार्‍या आदिमानवाने हजारो वर्षांपूर्वी चाकाचा शोध लावला. चाकाचा शोध लागल्यानंतर मानवाच्या प्रगतीची गती अधिकच वाढली. चाक आले आणि चाकापाठोपाठ गाडे आले, पुढे-पुढे चाकाचे महत्त्व अतिशय वाढले. आज तर परिस्थिती अशी आहे की, चाकाचा उल्लेख केल्याशिवाय आमचे कोणतेच गाडे पुढे सरकू शकत नाही. आमचेच कशाला आमच्या एवढ्या मोठ्या देशाचे गाडेसुद्धा चाकाशिवाय एक इंचसुद्धा हलू शकत नाही.

  • हे हलाहल आम्ही पचवू शकणार नाही

     
    प्रकाश पोहरे

    हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणाऱ्या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे. या शक्तींचे दुसरे लक्ष्य इथला तरुण वर्ग आहे. भारतीय संस्कृती आणि तरुण वर्ग अशी ही दोन तसेच व्यापार उदिम हे तिसरे लक्ष्य निर्धारित करताना गोऱ्यांनी कमालीचे बुध्दिचातुर्य दाखविले आहे. वरकरणी या तिन्ही बाबी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यांचा एकत्रित परिणाम एखाद्या राष्ट्राच्या विकासाला किंवा पतनाला परिणामकारकपणे प्रभावित करू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. संस्कृतीची वीण विरळ झाली की, त्याचा पहिला बळी ठरतो तो युवावर्ग.

  • पारतंत्र्याचे पाश आवळले जात आहेत!

     
    प्रकाश पोहरे

    मानवी इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे. वर्तमानही काही वेगळे नाही आणि भविष्यावरदेखील युद्धाचे सावट पडलेले स्पष्ट दिसत आहे. रक्तरंजित युद्धाचा आणि मानवाचा हा अन्योन्य संबंध निर्माण का झाला, युद्ध कशासाठी लढली जातात, या प्रश्नांची उत्तरे केवळ साम्राज्यविस्तार असे दिले जात असेल तर ते अतिशय त्रोटक ठरेल. साम्राज्यविस्तार हे वरकरणी दिसणारे कारण आहे.

  • जोत्स्ना भोळे यांना आदरांजली

     
    विद्याधर ठाणेकर

    ठाणे शहराचा संगीताचा इतिहास लिहिला गेला तर मो. ह. विद्यालयाच्या खुल्या रंगमंचावरील दि. २८ एप्रिल १९७४ ची रात्र सुवर्णाक्षरात लिहिली जाईल. कारणही तसेच आहे. कारण त्या रात्री “न भूतो न भविष्यती) असा नाट्यसंगीत मेजवानीचा कार्यक्रम मी स्वत: आयोजित केला होता. त्या रात्री संगीत क्षेत्रातील एकाहून एक सरस आणि दिग्गज गायक-कलावंतांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम होता ““नाट्यसंगीत रजनी?या कार्यक्रमात एकाचवेळी, एकाच मंचावर, एकाच रात्री त्याकाळातील लोकप्रिय पं. वसंतराव देशपांडे, रामदास कामत, शरद जांक्षेकर, प्रभाकर कारेकर, प्रसाद सावकार, विश्वनाथ बागुल, अलकनंदा वाडेकर (बकुळ पंडीत) जोत्स्ना मोहिले आणि जेष्ठ गायिका जोत्स्ना भोळे असे नऊ गायक गाऊन जेले. हा कार्यक्रम शनिवारी रात्रौ ९ वाजता सुरु होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता संपला.