(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह – temp

Sort By:

  • अव्यवहार्य योजनेचा अट्टाहास

    राष्ट्रीय सुरक्षा समितीने केंद्र सरकारला नुकतेच अन्न सुरक्षा विधेयक सादर केले. त्यानुसार ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्रयरेषेखाली तसेच सामान्य आणि सधन जीवन जगणार्‍या लोकांना दरमहा 35 किलो धान्य माफक दरात दिले जाणार आहे. अशा प्रकारची योजना लागू करण्याचा सोनिया गांधींचा अट्टाहास आहे. पण, त्यापायी या योजनेतील त्रुटींकडे दुलर्क्ष करण्यात आले आहे.

  • अयोध्या – कोण जिंकलं, कोण हरलं ?

    अयोध्येतील राम-जन्मभूमी आणि बाबरी मशीद हा वाद कित्येक वर्षे न्यायालयात आहे. नुकताच त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. आता अंतिम सुनावणी आणि निकालाची प्रतिक्षा आहे. याच मुद्द्यावर काही वर्षापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेला हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत. निमित्त आहे केवळ यामागची पार्श्वभूमी समजावून घेण्याचे !!

  • अभ्यासपूर्ण भाषणांचे महत्त्व संपले

    जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात संसद सर्वोच्च स्थानी आहे. संसदेचे पावित्र्य राखण्याचे काम खासदारांनी करणे अपेक्षित असते. आजवर अनेक संसदपटूंनी अभ्यासपूर्ण भाषणांनी जनतेचे आणि देशासमोरील महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लावले आहेत.

  • अंतर्गत मतभेदांनी ग्रासले राज्यकर्ते

    भिन्न मतप्रवाहांचे अनेक पक्ष एकत्र घेऊन सरकार चालवणे अवघड असल्याचा अनुभव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिग यांना रोजच येत आहे. विविध पक्षांचे मंत्री एकमेकांवर आरोप करत असताना काँग्रेसचे वरिष्ठ मंत्रीही गेल्या काही दिवसांपासून सहकार्‍यांबद्दल जाहीर विधाने करताना दिसत आहेत. त्यांच्यात अनेक मुद्यांवर असलेले मतभेद सतत चव्हाट्यावर येत आहेत. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग निष्प्रभ आणि हतबल दिसत आहेत.

  • अन्नधान्याच्या लागवडीला हवे प्राधान्य

    राज्यात आता रब्बी हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, यावेळी ज्वारीचे उत्पादन घटण्याचे संकेत आहेत. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ अपेक्षित असताना पहायला मिळणारी घट चिंताजनक आहे, याचा शेतकर्‍यांनी विचार करायला हवा. त्यामुळे पर्यायी पिकांची लागवड करताना अन्नधान्याच्या लागवडीलाही महत्त्व द्यायला हवे आहे.

  • “ऑनलाईन मंजुरी”चा नवा प्रवाह

    मंदीची तीव्रता कमी झाल्याने सर्वत्र अनेक गृहबांधणी प्रकल्प उभे राहत आहेत. प्रकल्पांच्या मंजुरीच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी ऑनलाईन अर्ज करायचा आणि महापालिकेने 15 ते 20 मिनिटात त्याची छाननी करूनमंजुरी द्यायची असे धोरण राबवण्याचा विचार होत आहे. पुणे महापालिकेने ही पद्धत अवलंबली आहे. गृहबांधणी उद्योगातील याताज्या प्रवाहाचा वेध.

  • अपघातांची मालिका कधी संपणार ?

    ताज्या रस्ते अपघातांमध्ये ‘सारेगामापा’ स्पर्धेतील लक्षवेधी गायक राहुल सक्सेना, अपूर्वा गज्जला, गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रितम मते असे अनेक मान्यवर जखमी पडले. गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यात रस्ते अपघातात अनेकांनी प्राण गमावले. अशा अपघातांना रस्त्यांची दुरवस्था, चालकांचा बेदरकारपणा कारणीभूत ठरत असला तरी अपघात टाळण्यासाठी प्रशासन फारसे काही करत नाही हेही खरेच. ही परिस्थिती कधी बदलणार?

  • “कॉपीराईट” कायद्यावर नव्याने प्रकाश

    ख्यातनाम साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या साहित्याच्या प्रकाशनाचे, विक्रीचे अधिकार कोणाकडे असावेत याविषयी त्यांचे वारसदार आणि देशमुख आणि कंपनी यांच्यात काही वर्षांपासून वाद होता. सर्वोच्च न्यायालयाने हे अधिकार खांडेकरांच्याच वारसांकडे कायम राहणार असल्याचे जाहीर केल्याने या वादावर पडदा पडला. या निमित्ताने कॉपीराईट कायद्यातील तरतुदींवर नव्याने प्रकाश पडला आहे. त्यानिमित्ताने…

  • अर्जुनने घडवला इतिहास

    गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रीडाक्षेत्राला सुवर्णयश अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्विनी सावंतने जागतिक नेमबाजी स्पर्धेत प्रोन प्रकारात सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत देशाची मान उंचावली. जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावणारी सायना नेहवाल करोडो भारतीयांच्या अपेक्षा घेऊन जागतिक बॅडमिटन स्पर्धेत उतरली आहे. यापाठोपाठ अर्जुन अटवाल या गोल्फपटूने भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने विडहॅम चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकत विक्रम केला.

  • अनिल, लिखते रहो !

    प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. बालसाहित्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहेच, पण अनिल अवचटांसारख्या समाजकार्यात रमलेल्या लेखकाच्या वेगळ्या प्रयत्नाला मिळालेली दाद म्हणूनही या पुरस्काराचे मोल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बालसाहित्याकडे वळलेल्या आणि कसदार साहित्य निर्मिती करणार्‍या डॉ. अवचटांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केलेले कौतुक.