वैचारिक लेखन

  • मूर्ख आणि शहाणे! शिका! – Premium

     

    प्रकाश पोहरे

    समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्‍या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.

  • जरा आजूबाजूला बघायला शिका! – Premium

     

    प्रकाश पोहरे

    बायबलमध्ये एक बोधकथा आहे. येशू ख्रिस्त फिरत-फिरत एका गावात आले. त्यावेळी त्यांना दिसले की गावातील सगळेच लोकं एका मैदानात जमले आहेत. प्रत्येकाच्या हातात दगड आहे आणि मैदानाच्या मध्यभागी एका खांबाला बांधलेल्या स्त्रीला ते दगडांनी ठेचून मारणार आहेत. त्या स्त्रीचा अपराध कोणता, याची चौकशी केल्यावर येशू ख्रिस्तांना सांगण्यात आले की, ही स्त्री व्यभिचारी आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिला दगडांनी ठेचून मारण्यात येणार आहे.

  • तर्कशास्त्राची ऐशीतैशी – Premium

     

    प्रकाश पोहरे

    जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत मानवाला अधिक बुध्दिमत्तेचे वरदान लाभले आहे. या अत्त्याधिक (?) बुध्दीचा वापर करून मानवाने आपले भौतिक, भावनिक, मानसिक जीवन समृध्द करण्यासाठी अनेक शास्त्रांना जन्म दिला. चौसष्ट कलांची चौसष्ट शास्त्र निर्माण झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये. या शास्त्रांच्या गर्दीतलेच एक शास्त्र आहे, ‘तर्कशास्त्र’! एखाद्या ठिकाणी धूर दिसत असेल तर तिथे आग असतेच, हा तर्कशास्त्राचा पायाभूत सिध्दांत. थोडक्यात एखाद्या गोष्टीची अनुभूती, अनुभव न घेता अनुमानाने त्या गोष्टीचे अस्तित्त्व सिध्द करणे म्हणजे तर्कशास्त्र. मोठमोठ्या विद्वान, शास्त्रज्ञांना हे तर्कशास्त्र जसे उपयोगी पडले किंवा पडत आहे

  • खाण तशी माती – Premium

     

    प्रकाश पोहरे

    ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. बीज जर शुद्ध असेल तर त्यापासून तयार होणाऱ्या झाडाला लागणारी फळे रसरशीत, कसदार आणि अवीट चवीचीच असणार. मात्र मुळात बीजच अशुद्ध असेल तर फळेही निकस आणि निकृष्टच निपजणार. हा न्याय केवळ वनस्पतीसृष्टीलाच लागू आहे, असे नाही. खरे म्हटले तर हा न्याय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू पडतो. एखाद्या कुटुंबातील मुले नालायक निघालीत तर आपण सहजच म्हणून जातो, ‘पेराल ते उगवेल’.

  • आता उरले लुटण्यापुरते

     

    प्रकाश पोहरे

    पृथ्वीचा फेरफटका मारताना एकदा आद्य वार्ताहर नारदमुनींना एक गलेलठ्ठ डुक्कर घाणीत/गटारात लोळताना दिसले. ईश्वरी अवताराचे महाभाग्य लाभलेल्या वराहाची ती अवस्था नारदाला पाहवली नाही. नारदमुनींनी लगेच त्या वराहाला स्वर्गसुखाची अनुभूती द्यायचे ठरवले आणि स्वत:बरोबर स्वर्गात येण्याची विनंती केली. थोड्याशा नाराजीनेच वराह राजे स्वर्गात यायला तयार झाले. शेवटी स्वर्गसुखाची अभिलाषा ते तरी कसे टाळू शकत होते? नारद त्या वराहाला घेऊन स्वर्गात दाखल झाले. स्वर्गच तो! तिथे कशाची कमतरता? अमृताचे झरे, मदमस्त मदनिकांचा नृत्यविलास, कल्पवृक्षाने डवरलेले अनुपमेय सृष्टिसौंदर्य! नारदाने कौतुकमिश्रित उत्सुकतेने त्या वराहाला विचारले, ‘कसा वाटला स्वर्ग?’ चेहऱ्यावरची रेषही न हलू देता वराह उद्गारले, ‘हा कसला स्वर्ग? इथे तर मला लोळायला एकही गटार नाही, चाखायला थोडीसुद्धा घाण नाही, कसलाच आनंद नाही. तुमचा स्वर्ग तुम्हालाच लखलाभ. मला परत पृथ्वीवर घेऊन चला. तिथल्या गटारात लोळण्यात आणि घाणीत तोंड खुपसण्यातच माझे खरे स्वर्गसुख आहे’. त्या वराहाचे उत्तर ऐकून नारदांनी कपाळावर हात मारून घेतला.

  • नवी अस्पृश्यता

     

    प्रकाश पोहरे

    सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.