नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

गावाकडची गोष्ट………..।
.. सकाळ झाली होती झाडावरील पक्षानी आपापली घरटी सोडली होती पक्षी पूर्व दिशेला आकाश मार्गाने भरारी घेऊन पोट कसे भरेल या तयारी त होते. प्रत्येक मानवाला स्वतःचे पोट कसे भरेल याची चिंता लागलेली असते त्याच प्रमाणे मुक्या पक्षाची सुद्धा अशीच गत असते. पोटासाठी मुखे पक्षी भ्रमंती करतात त्याचप्रमाणे मानव सुद्धा वीतभर पोटासाठी भ्रमंती करतो. असे हे उदाहरण सर्वांनाच लागू आहे असे म्हणायचे वावगे ठरणार नाही. माणूस म्हणून किंवा पक्षी म्हणून अशा साठी जगणे हे मला मान्य नाही माणसाने कष्ट करावे स्वतःचे पाय हलवावेत. किंवा मुक्या प्राण्यांची हलचाल करून पोट भरावे असे मला वाटते.

माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून… समोर स्वाक्षऱ्या आहेत… स्वतः येऊन केलेल्या.. मोठी माणसे..मोठी स्वप्ने..मोठे यश.. सर्व काही माझ्या घराच्या भीतीवर वसलेले आहे… शब्दाच्या रूपात…

नेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली .
बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ? तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला .

त्याचे लिखाण संशोधित करून, एकत्र ठेवण्याचा व त्याची सूची ठेवण्यासाठी एक संस्था अजूनही कार्यरत आहे. त्याने अनेकानेक वृत्तपत्रांतून अनेक वर्षे लिहिल्यामुळे तो संशोधनाचा विषय झाला आहे व नेहमी नवीन कांही तरी सापडतच असते. त्याची सामाजिक विषयांवरची मते अत्यंत प्रागतिक होती. काळ्या लोकांना जी वागणूक देण्यात यायची त्यावर तर तो टिका करतच असे पण एकंदरीतच स्त्रीयांसह सर्वांना व्यक्तीस्वातंत्र्य त्याला अभिप्रेत होते. साम्राज्यशाही, भांडवलदारांनी चालवलेली कामगारांची पिळवणूक ह्यांवर तो प्रखर टिका करत असे. अनेकवेळा चर्चच्या त्या काळांतील प्रभावामुळे व त्याच्या अशा मतांमुळे त्याच्या पुस्तकांवर सेन्सॉरकडून बंदी घालण्यांत आली. त्याला कॉपीराईटसाठीही अनेकदा झगडावे लागले. त्याला पूर्ण लोकमान्यता व राजमान्यता नंतरच मिळाली परंतु त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण साहित्यावरच कायम आपला ठसा राहिलं असे विपुल लेखन केले यांत शंका नाही. त्यामुळे साहित्यात मार्क ट्वेनचे नांव अजरामर झाले आहे.
अशा वेळी कोणाला कोरोनाची लागण झाली तर काय होईल ह्या भीतीने प्रत्येकजण हादरला आहे. जहाजावर कोणी नवीन माणूस येऊ नये असे सुद्धा प्रत्येकाला वाटत आहे. नवीन येणार असतील तर सगळ्यांनाच एकदम जाऊ द्या असेही काहीजणांना वाटते आहे. परंतु हे शक्य नाही कारण प्रत्येक जण हेल्पलेस आहे.
माझ्यावर औषधोपचार सुरु झाले सतीश गांधी डॉक्टरांनी मला पेनीसिलीनचे इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगितलं. त्यावेळेस हे इंजेक्शन द्यायला आणि त्यातल्या त्यात साडे सहा वर्षांच्या मुलाला द्यायचे याबद्दल गांधी डॉक्टरांसह सगळ्यांनाच भीती वाटत होती.

तिला काय अपेक्षित होते ते माहित नाही पण मी बोलून गेलो. मला माझीच मजा वाटली कारण हे उत्तर मी कसे दिले .

आम्हीच माघार घेतली पाहिजे बरोबर आहे घर त्यांच राज्यही त्यांचेच आम्ही आश्रीत तेंव्हा बोलायचे नाही गप्प गुमान बंद करा आणि बसा शांत. आता नानांची पण काही चूक नाही. आर्थिक परिस्थिती मुळे सिनेमा नाटक सहली काहीही जमले नाही व्यवसाय. कामाचा व्याप मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा व वेळ गेला. आत्ता कुठे सगळे स्थिरस्थावर झाले आहे.

गिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. आपल्या बहिणीसाठी रत्नाकरनी त्यावेळी या लग्नाला नकार दिला. अखेर बहिणही अविवाहित राहूनच स्वर्गवासी झाली. परंतू गिरीजाआत्या आणि रत्नाकरकरकाकांचं लग्न मात्र ती हयात असतानाच झालं. यालाच म्हणतात नियतीचा खेळ.

“याला” त्याच्या desk वरून “ती” दिसायची … department वेगळं होतं म्हणून कामानिमित्त कधी बोलायची वेळ नाही आली … पण जाम आवडायची … ती सुद्धा अधून मधून डोकवायची … थोडा अंदाज तिलाही आला होता … हा मात्र बुजरा … कधी बोलू – कसं बोलू ?…या विचारात दिवस संपून जायचा
Copyright © 2025 | Marathisrushti