वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….


दैनिक लोकसत्ता, दैनिक केसरी या वृत्तपत्रांचे माजी संपादक श्री. अरविंद व्यं. गोखले यांनी तीन वेळा पाकिस्तानला भेट देऊन लिहिलेल्या थरारक आठवणींचा हा संग्रह. पाकिस्तानच्या सर्व प्रमुख शहरांना भेट देऊन तेथील राजकीय / सामाजिक परिस्थितीचे मार्मिक चित्रण श्री. गोखले यांनी केलेले आहे.
तत्कालीन पंतप्रधान श्रीमती बेनझीर भुट्टो यांची परखड मुलाखत हेही या संग्रहाचे एक प्रमुख वैशिष्ट्य.
पाकिस्तानविषयी कुतुहल असणाऱ्या वाचकांना आणि अभ्यासकांनाही हा संग्रह उपयुक्त वाटेल.

डॉ. अनिल कुलकर्णी यांचा शिक्षण क्षेत्रासंबंधी लेखांचा हा संग्रह अतिशय वाचनीय आणि उद्बोधक आहे.
कायस्थ मंडळी खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ ! याला महत्वाचे कारण म्हणजे कायस्थ स्त्रिया पाककला निपुण असतात. कसे तरी रांधून जेवण शिजवावे हे त्यांना पटत नाही. प्रत्येक पदार्थ मोठ्या नजाकतीने तयार करून पेश करणार पण तरीही पारंपरिक कायस्थी पदार्थ पारंपरिक पद्धतीनेच तयार होणार. माझ्या लहानपणापासून माझी आई, आजी, मावशी, असेल. काकी इत्यादींनी माझ्या जिभेचे चोचले पुरवले. प्रत्येक कायस्थ पुरुषांचा हाच अनुभव. आधुनिक तरुणींना मौखिक परंपरेने शिकवले जाणारे हे पदार्थ माहित असतीलच असे नाही. त्यांना अनुभवसिध्द मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणूनच खास, चविष्ट तरीही पौष्टिक अशा कायस्थ पदार्थांच्या पाकक्रिया मी प्रसिद्ध करायचे ठरवले. तसेच परंपरागत सणवार कायस्थ मंडळी कशा तऱ्हेने करतात याचेही संकलन करायचे ठरवले. गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही खाद्य संस्कृती आपणासमोर सादर आहे या पुस्तकाच्या माध्यमातून….

अनघा प्रकाशनचा हा 2016 चा दिवाळी अंक संत तुकारामांवर आहे.
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेला हा श्री गणपती स्तोत्राचा हा मराठी अनुवाद.




पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत. शहरी जीवनावर मार्मिक टिप्णी करणार्या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा `गेटवे’ हा संग्रह त्यातील मुंबई शहराशी संबंधित छोट्या कथा आणि रेखाचित्रे यामुळे प्रसिद्ध झाला.

जागतिकीकरणाबद्दल चिंतन करणारे काही मुद्दे मांडले आहेत या पुस्तकात, लेखक श्री सुभाष नाईक यांनी.
Copyright © 2025 | Marathisrushti