पॉडकास्ट

  • लग्नांमध्ये उरलेल्या अन्नाचे काय होते?

    लग्नांमध्ये उरलेल्या अन्नाचे काय होते?

     
  • विख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी, गीतिका वर्दे कुरेशी, शिखर नाद कुरेशी, फैजान हुसेन शेख, अफ्शा शेख

     

    विख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी, गीतिका वर्दे कुरेशी, शिखर नाद कुरेशी, फैजान हुसेन शेख, अफ्शा शेख
    पद्मश्री उस्ताद अल्लारखॉं साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणींचा जागर करत आहेत..

  • संगीत सम्राज्ञी पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांच्याबरोबर दिलखुलास संवाद

     

    भारतीय शास्त्रीय कंठ्य संगीताची निःसंशयरित्या अनभिषिक्त सम्राज्ञी असणाऱ्या बेगम परवीनजींची संगीत विषयक भूमिका, त्यांचा त्यांचा संगीतमय जीवनप्रवास, त्यांनी आजचे शिखरस्थ स्थान प्राप्त करण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत हे सारं त्यांच्याच कडून समजून घेऊ या.

  • संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार मधुकर भावे

     

    महाराष्ट्र होता कुठे ? महाराष्ट्र चालला कुठे ?
    संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा करणारा शेतकरी व कामगार यांची आज संयुक्त महाराष्ट्राच्या साठीनंतर नेमकी स्थिती आहे कशी?
    जाणून घेऊया संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार, खणखणीत विचार दणदणीतपणे मांडणारे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे

  • संगीतकार कौशल इनामदार

     

    मराठी अभिमान गीत हा मराठीतील एक फार भव्य आविष्कार… शेकडो कलाकारांनी हजारो तासांच्या मेहनतीने ही भव्य कलाकृती उभी केली. यामागे प्रेरणा होती सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांची. अभिमानगीताची गोष्ट तर आपण बर्‍याचदा ऐकली असेल. आज संगीतकार कौशल इनामदार यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा ऐकूया.

  • “संवाद” – सिद्धहस्त कथाकार, कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे

     

    आपल्या वेगळ्या शैलीने, लेखनातील सातत्याने केल्या जाणार्‍या प्रयोगांमुळे, कथानकातील वैविध्यामुळे, रंगनाथ पठारे ही नाममुद्रा मराठी साहित्य विश्वात स्थिरावली आहे. जगण्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास निवडून, पठारे गेली चार दशकं सातत्याने लिहित आहेत.

  • मुशाफिरी जागतिक सिनेमाची – इराणी सिनेमाची ओळख करुन देतायत सिने-समिक्षक अशोक राणे

     

    कार्यक्रम बघण्यासाठी क्लिक करा

    बॉलिवूड, हॉलिवूड प्रमाणेच जगातील अनेक देशांमध्ये सिने-संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे जोपासली जातेय. जागतिक सिनेमाची ओळख करुन देणारा हा कार्यक्रम. या भागात “सिनेमा पहाणारा माणूस” म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ सिने समिक्षक श्री अशोक राणे आपल्याला ओळख करुन देत आहेत इराणी सिनेमाची.

  • गप्पा , गोष्टी आणि मृदगंध

    गप्पा , गोष्टी आणि मृदगंध

     

    InnoTalks च्या ह्या Episode मध्ये, एक सुवर्ण संधी मिळाली – दोन दिग्गज कलाकारांबरोबर बसून गप्पा मारण्याची.

    खरं तर ह्याचं श्रेय  Gaurav Bhide प्रस्तुत मृदगंध ह्या कार्यक्रमाला, जो पुण्यामध्ये  २१ जून २०२५ ला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह  इथे पार पडणार आहे.

    आम्ही खूप गप्पा मारल्या ह्या निमित्ताने –

  • आजच्या युगातील राजाचे आयुष्य कसे असते?

    आजच्या युगातील राजाचे आयुष्य कसे असते?

     

    अक्कलकोट संस्थानाचे श्रीमंत मालोजीराजे (|||) संयुक्ताराजे भोसले अक्कलकोटचे राजसाहेब ह्यांच्यासोबत आपण पॉडकास्ट केला. अक्कलकोट संस्थान त्याकाळी का आणि कसं महत्वाचं होतं हे राजेंनी सांगितलं. स्वामी समर्थ आणि राज घराणे ह्यांचं काय connection आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि अक्कलकोट राज घराण्याचे connection ह्याबद्दल बरीच माहिती राजेंनी दिली!
    श्री स्वामी समर्थ!