वैचारिक लेखन

  • तर्कशास्त्राची ऐशीतैशी – Premium

     
    प्रकाश पोहरे

    जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत मानवाला अधिक बुध्दिमत्तेचे वरदान लाभले आहे. या अत्त्याधिक (?) बुध्दीचा वापर करून मानवाने आपले भौतिक, भावनिक, मानसिक जीवन समृध्द करण्यासाठी अनेक शास्त्रांना जन्म दिला. चौसष्ट कलांची चौसष्ट शास्त्र निर्माण झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये. या शास्त्रांच्या गर्दीतलेच एक शास्त्र आहे, ‘तर्कशास्त्र’! एखाद्या ठिकाणी धूर दिसत असेल तर तिथे आग असतेच, हा तर्कशास्त्राचा पायाभूत सिध्दांत. थोडक्यात एखाद्या गोष्टीची अनुभूती, अनुभव न घेता अनुमानाने त्या गोष्टीचे अस्तित्त्व सिध्द करणे म्हणजे तर्कशास्त्र. मोठमोठ्या विद्वान, शास्त्रज्ञांना हे तर्कशास्त्र जसे उपयोगी पडले किंवा पडत आहे

  • खाण तशी माती – Premium

     
    प्रकाश पोहरे

    ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. बीज जर शुद्ध असेल तर त्यापासून तयार होणाऱ्या झाडाला लागणारी फळे रसरशीत, कसदार आणि अवीट चवीचीच असणार. मात्र मुळात बीजच अशुद्ध असेल तर फळेही निकस आणि निकृष्टच निपजणार. हा न्याय केवळ वनस्पतीसृष्टीलाच लागू आहे, असे नाही. खरे म्हटले तर हा न्याय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू पडतो. एखाद्या कुटुंबातील मुले नालायक निघालीत तर आपण सहजच म्हणून जातो, ‘पेराल ते उगवेल’.

  • सज्जनांची तटस्थता

     
    प्रकाश पोहरे

    आज संपूर्ण जग हे समस्यांचे माहेरघर झालेले आहे. एकजात सर्वांनी होकारार्थी माना डोलवाव्यात असेच हे वाक्य आहे आणि सर्वांच्या माना डोलतातसुध्दा. परंतु केवळ माना डोलावण्याने काय साध्य होणार? समस्या उद्भवणे आणि त्यांचे निराकरण हे जगाचे रहाटगाडगे चालू राहण्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे समस्यांच्या निराकरणाचा प्रयत्न व्हायला पाहिजे. असा प्रयत्न आज होताना दिसत नाही किंवा होतही असतील तर त्याचे प्रमाण आणि परिणाम अत्यल्प असतात. आज संपूर्ण जग समस्यांचे माहेरघर झाले आहे, असे म्हणावे लागते ते त्याचमुळे. समस्या उद्भवण्याचे प्रमाण आणि त्यांच्या निराकरणाचा प्रयत्न यातील दरी दिवसेंदिवस रूंद होत आहे. यामागे प्रमुख कारण जर कोणते असेल तर ते म्हणजे समस्यांच्या मुळापर्यंत न जाता येणे.

  • नोकरशाहीचे उफराटे सल्ले

     
    प्रकाश पोहरे

    प्रगतीचा एकेक टप्पा गाठणार्‍या आदिमानवाने हजारो वर्षांपूर्वी चाकाचा शोध लावला. चाकाचा शोध लागल्यानंतर मानवाच्या प्रगतीची गती अधिकच वाढली. चाक आले आणि चाकापाठोपाठ गाडे आले, पुढे-पुढे चाकाचे महत्त्व अतिशय वाढले. आज तर परिस्थिती अशी आहे की, चाकाचा उल्लेख केल्याशिवाय आमचे कोणतेच गाडे पुढे सरकू शकत नाही. आमचेच कशाला आमच्या एवढ्या मोठ्या देशाचे गाडेसुद्धा चाकाशिवाय एक इंचसुद्धा हलू शकत नाही.

  • हे हलाहल आम्ही पचवू शकणार नाही

     
    प्रकाश पोहरे

    हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणाऱ्या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे. या शक्तींचे दुसरे लक्ष्य इथला तरुण वर्ग आहे. भारतीय संस्कृती आणि तरुण वर्ग अशी ही दोन तसेच व्यापार उदिम हे तिसरे लक्ष्य निर्धारित करताना गोऱ्यांनी कमालीचे बुध्दिचातुर्य दाखविले आहे. वरकरणी या तिन्ही बाबी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यांचा एकत्रित परिणाम एखाद्या राष्ट्राच्या विकासाला किंवा पतनाला परिणामकारकपणे प्रभावित करू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. संस्कृतीची वीण विरळ झाली की, त्याचा पहिला बळी ठरतो तो युवावर्ग.

  • पारतंत्र्याचे पाश आवळले जात आहेत!

     
    प्रकाश पोहरे

    मानवी इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे. वर्तमानही काही वेगळे नाही आणि भविष्यावरदेखील युद्धाचे सावट पडलेले स्पष्ट दिसत आहे. रक्तरंजित युद्धाचा आणि मानवाचा हा अन्योन्य संबंध निर्माण का झाला, युद्ध कशासाठी लढली जातात, या प्रश्नांची उत्तरे केवळ साम्राज्यविस्तार असे दिले जात असेल तर ते अतिशय त्रोटक ठरेल. साम्राज्यविस्तार हे वरकरणी दिसणारे कारण आहे.

  • अति तिथं माती

     
    प्रकाश पोहरे

    भारतीय पुराणातील भस्मासुराची आणि युरोपियन लोकसाहित्यातील मिडास राजाची कथा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. भस्मासुराची प्रवृत्ती आणि आताच्या अतिरेक्यांची प्रवृत्ती यामधील साम्य लक्षात घेतल्यास भस्मासुराला आद्य क्रांतिकारकाच्या धर्तीवर आद्य अतिरेकी म्हणून संबोधण्यास हरकत नाही. तर अशा या भस्मासुराने भगवान शंकराला वर मागितला होता की, तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू भस्मसात होऊन जाईल. भोळा सांब म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकराने परिणामांचा विचार न करता तथास्तू म्हणून टाकलं. आता आपलं कोण काय वाकडे करु शकतो, या विचाराने उन्मत झालेल्या भस्मासुराने सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. आणि शेवटी तो साक्षात भगवान शंकराच्याही मागे लागला.

  • डॉक्टर आजारी झालेत!!

     
    प्रकाश पोहरे

    मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हटले जाते. नव्हे तो समाजप्रिय प्राणी आहेच. आदिम काळातील रानटी अवस्थेपासून मनुष्यप्राण्याची ती स्वाभाविक गरज ठरत आली आहे. शत्रूच्या तुलनेत शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेले प्राणी समूहाने वावरून आपली सुरक्षितता जोपासतात, हा निसर्गनियम आहे आणि मानव त्याला अपवाद नाही. ही सुरक्षितता जोपासताना एकमेकांना सहकार्य आणि आलेल्या संकटाचा सामूहिक मुकाबला केला जातो. प्रगत मानवात ही व्यवस्था समाजाच्या रूपाने अधिक विकसित झाली. परस्परांच्या सहकार्याने सुखी आणि समृध्द जीवन व्यतीत करणे सामाजिक व्यवस्थेचा पाया ठरला. इतर प्राण्यांमध्ये ही व्यवस्था प्राथमिक स्वरूपात असताना मानव प्राण्याने मात्र आपल्या बौध्दिक विकासाच्या जोरावर ही व्यवस्था चांगलीच सुदृढ केली. असे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता मानव स्वत:च्या हाताने ही व्यवस्था उद्ध्वस्त करायला निघाला की काय, अशी साधार भीती वाटू लागली आहे.

  • निखार्‍यांचा कोळसा होऊ नये!

     
    प्रकाश पोहरे

    रघुराजाने थेट स्वर्गलोकीचा खजिनदार कुबेरावर हल्ला करायचे ठरविले. महापराक्रमी रघुराजा आपल्यावर चालून येण्याच्या विचारात आहे, ही बातमी कुबेरापर्यंत पोहचली. (कुबेराचे हेरखाते आपल्या भारताच्या हेरखात्याएवढे अकार्यक्षम थोडेच होते!) रघुराजाचा पराक्रम माहीत असलेल्या कुबेराने राजाचा हल्ला होण्यापूर्वीच आपला संपूर्ण खजिना रघुराजाच्या राजधानीबाहेर असलेल्या एका आपट्याच्या झाडाखाली रिता केला. कुबेर असला तरी त्याला आपल्या प्राणाची काळजी होतीच. शेवटी त्या याचकाला हवे तेवढे द्रव्य देऊन रघुराजाने उर्वरित संपत्ती जनतेला लुटून नेण्यास सांगितले. कथा पौराणिक असली तरी मार्मिक आणि बोधप्रद आहे. ही घटना घडून हजारो वर्षे उलटून गेली, परंतु त्या कथेतील पात्रे विविध रूपाने आजही जिवंत आहेत.

  • आता उरले लुटण्यापुरते

     
    प्रकाश पोहरे

    पृथ्वीचा फेरफटका मारताना एकदा आद्य वार्ताहर नारदमुनींना एक गलेलठ्ठ डुक्कर घाणीत/गटारात लोळताना दिसले. ईश्वरी अवताराचे महाभाग्य लाभलेल्या वराहाची ती अवस्था नारदाला पाहवली नाही. नारदमुनींनी लगेच त्या वराहाला स्वर्गसुखाची अनुभूती द्यायचे ठरवले आणि स्वत:बरोबर स्वर्गात येण्याची विनंती केली. थोड्याशा नाराजीनेच वराह राजे स्वर्गात यायला तयार झाले. शेवटी स्वर्गसुखाची अभिलाषा ते तरी कसे टाळू शकत होते? नारद त्या वराहाला घेऊन स्वर्गात दाखल झाले. स्वर्गच तो! तिथे कशाची कमतरता? अमृताचे झरे, मदमस्त मदनिकांचा नृत्यविलास, कल्पवृक्षाने डवरलेले अनुपमेय सृष्टिसौंदर्य! नारदाने कौतुकमिश्रित उत्सुकतेने त्या वराहाला विचारले, ‘कसा वाटला स्वर्ग?’ चेहऱ्यावरची रेषही न हलू देता वराह उद्गारले, ‘हा कसला स्वर्ग? इथे तर मला लोळायला एकही गटार नाही, चाखायला थोडीसुद्धा घाण नाही, कसलाच आनंद नाही. तुमचा स्वर्ग तुम्हालाच लखलाभ. मला परत पृथ्वीवर घेऊन चला. तिथल्या गटारात लोळण्यात आणि घाणीत तोंड खुपसण्यातच माझे खरे स्वर्गसुख आहे’. त्या वराहाचे उत्तर ऐकून नारदांनी कपाळावर हात मारून घेतला.