वैचारिक लेखन

  • दिसण्यावर जाऊ नका असण्यावर जा

     
    डॉ. अनिल कुलकर्णी

    ओठाकडे लक्ष द्यायला मला अभ्यासातून ना वेळ मिळाला न मिळणार आहे मला आयआयटी करायचे आहे, त्यांना जे वाटते ते त्यांनी लिहिले मला त्यांच्या बोलण्याची काहीच वाटत नाही ते तितके महत्त्वाचे नाही सुद्धा. 55 लाख विद्यार्थ्यांमधून यु.पी.बोर्डातून प्रथम येणारी प्राची निगम वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली. अस्तित्वाचा स्विकार करतांना वैगुण्यावर व वैगुण्यासह सत्वता:वर प्रेम करता आलं की लोकांना अस्तित्वाच्या चांगल्या अंगाची दखल घ्यावीच लागते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरिक सौंदर्य शेवटी मनुष्याला घडवतं.मनुष्य हा परिपूर्ण कधीच नसतो. प्रत्येकामध्ये गुण आणि वैगुण्य असतातच. आपल्यातलं एखादं वैगुण्य विसरून स्वतः स्वतःवर प्रेम करत ध्येयाकडे वाटचाल केली की यश आपलच असतं. धडधाकट लोकच इतिहास घडवितात असं नव्हें, तर अंध, अपंग,लुळेपांगळे, वाळीत टाकलेले यांनी सुद्धा इतिहास घडविला आहे, प्रेरणेची पायवाट निर्माण केली आहे. शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे नावात काय आहे तसंच दिसण्यात काय आहे हे प्राची ने दाखवून दिले आहे. ब्रेन अंध असूनही त्याने ब्रेल लीपी तयार करून अंधासाठी प्रेरणेची पायवाट निर्माण केली. समाज माध्यमातील स्वैराचारा मुळे आज कुणालाही टारगेट केले जात आहे.

  • बालसाहित्यिकांच्या प्रेरणेची भरारी (Basic)

     
    डॉ.अनिल कुलकर्णी

    पुण्यात काही दिवसापूर्वी एका बाल साहित्य महोत्सवाचे उद्घाटन भावार्थ व संवाद तर्फे आयोजित केले होते.आराध्या नंदकर, साक्षी भांड व पालवी मालुंजकर या तीन मुलींनी उद्घाटन केले होते. राजीव तांबे यांनी या तीनही मुलींची साहित्यिक म्हणून मुलाखत घेतली. अनेक बाल साहित्य संमेलनातूनही मुलांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.असे उपक्रम प्रेरणेचे वारंवार घडायला हवेत. पुस्तक प्रदर्शनातही आता मुला मुलींचे साहित्यिक म्हणून पुस्तकें स्टाॅल वर ठेवली जातात.मुले लिहीत आहेत ती केवळ प्रेरणेमुळेच. समृद्ध माणसांचा राबता घरात असण्याबरोबरच पुस्तकांचाही राबता घरात असेल तर मुले वाचू लागतात, लिहू लागतात.

  • नव्या कुरणांची निर्मिती – Basic

     
    प्रकाश पोहरे

    साखर. मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मधूमेहाचे रोगी सोडले तर उर्वरीत मनुष्यजातीतील एकाचाही एकही दिवस बिनासाखरेचा जात असेल, असे वाटत नाही. मानवाचे संपूर्ण जीवन व्यापणार्‍या या साखरेला महाराष्ट्रात तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील सर्वाधिक पुढारलेले राज्य म्हणून मिरविणार्‍या या राज्याचे राजकारण साखरेभोवती फिरत असते, असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. राज्याच्या पश्चिम भागाने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर प्रचंड विकास साधून घेतला आहे आणि देशातील एक संपन्न भाग म्हणून नावारूपाला आला आहे. पश्चिम महाराष्ट्राने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर घेतलेली प्रगतीची झेप बघून मराठवाडा व विदर्भ या तुलनेत अविकसित भागातही, सहकारी साखर कारखाने उभे राहिलेत.

  • वृद्धाश्रमाऐवजी ज्ञानमंदिरे उभारा! – Basic

     
    प्रकाश पोहरे

    समाजजीवनात किंवा वैयक्तिक पातळीवरसुध्दा या नियमाचा प्रत्यय आपण घेतच असतो. आता हेच बघा, भौतिक क्षेत्रात म्हणजेच विज्ञानात मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. गेल्या शे-दीडशे वर्षात आपण विज्ञानात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतल्यास शे-दीडशे वर्षापूर्वीचे जग आणि आताचे जग यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. परंतु त्याचवेळी हा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, विकासाचे घोडे वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने चौखूर उधळत असताना विरोध विकास बलाने नेमके कोणत्या दिशेने कार्य केले असावे? या प्रश्नाचे उत्तर फारसे कठीण नाही.

  • अनाकलनीय अर्थशास्त्र – Basic

     
    प्रकाश पोहरे

    परवा एका परिचिताच्या घरी गेलो होतो. घर कसलं एक छोटासा बंगलाच होता तो; एका सुखवस्तू घरात आढळणार्‍या सर्वच वस्तू, जसे रंगीत दूरचित्रवाणी संच, दूरध्वनी, शीतकपाट (फ्रीज), स्वयंचलित दुचाकी सगळं काही त्यांच्याकडे होतं. क्षेमकुशल वगैरे औपचारिक बोलणी झाली. तसं सगळं काही व्यवस्थित दिसत होतं, परंतु ते परिचित गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबिय फारसे प्रसन्न वाटत नव्हते. मी त्याचे कारण विचारले तेव्हा समजले की ते गृहस्थ कर्जाच्या विळख्यात सापडले असून कर्जाचे हप्ते कसे फेडावे, या चिंतेने सगळं कुटुंबच चिंताठास्त आहे.

  • घातल्या पाण्याने गंगा वाहत नसते! – Basic

     
    प्रकाश पोहरे

    उद्योग क्षेत्राला ही अवकळा का प्राप्त झाली, यामागच्या कारणांचा धांडोळा घेतल्यास असे आढळून येते की, उद्योगाचा वटवृक्ष तोलून धरणारी मुळंच कमजोर, जीर्ण झाली आहेत आणि दुदैवाने या मुळांकडे कुणी लक्ष पुरवायला तयार नाही. शासनाची जबाबदारी यासंदर्भात बरीच मोठी आहे, परंतु शासनदेखील वरवरची लिपापोती करण्यातच मग्न आहे. उद्योगाला चालना द्यायची म्हणजे नेमके काय करायचे, हेच मुळी शासनाला समजलेले नाही. पंचतारांकित अद्ययावत उद्योग परिसर उभा करणे, रस्त्यांवर चकचकीत प्रकाश फेकणारे दिवे लावणे, रस्त्यांच्या कडने फुलांचे ताटवे फुलविणे, असले प्रकार उद्योजकांना आकर्षित करतील असे शासनाला वाटत असेल तर ते नक्कीच मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत, असे म्हणावे लागेल.

  • आणखी एक इशारा! – Basic

     
    प्रकाश पोहरे

    नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे. जाचक रुढी-परंपरांच्या माध्यमातून हिंदू धर्म केवळ मुठभरांच्या हातातले बाहुले बनला असून, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजनांना विकासाचा वावच या मुठभरांनी मिळू दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

  • वाट, वाटसरू आणि वाटाडे! – Premium

     
    प्रकाश पोहरे

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे जे अनेक भाग झाले आहेत त्यापैकी दोन भागांचे शक्तिप्रदर्शन विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात पार पडले. शक्तिप्रदर्शनापूर्वी उभय गटातील वाद एवढा विकोपास गेला होता की संघर्षाची ठिणगी पडते की काय, असे वाटायला लागले होते. सुदैवाने ती परिस्थिती टळली. मात्र या शक्तिप्रदर्शनाच्या निमित्ताने रिपब्लिकन नेत्यांच्या बुद्ध धर्माच्या निष्ठेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • मूर्ख आणि शहाणे! शिका! – Premium

     
    प्रकाश पोहरे

    समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्‍या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.

  • जरा आजूबाजूला बघायला शिका! – Premium

     
    प्रकाश पोहरे

    बायबलमध्ये एक बोधकथा आहे. येशू ख्रिस्त फिरत-फिरत एका गावात आले. त्यावेळी त्यांना दिसले की गावातील सगळेच लोकं एका मैदानात जमले आहेत. प्रत्येकाच्या हातात दगड आहे आणि मैदानाच्या मध्यभागी एका खांबाला बांधलेल्या स्त्रीला ते दगडांनी ठेचून मारणार आहेत. त्या स्त्रीचा अपराध कोणता, याची चौकशी केल्यावर येशू ख्रिस्तांना सांगण्यात आले की, ही स्त्री व्यभिचारी आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिला दगडांनी ठेचून मारण्यात येणार आहे.